अचलपूर: अचलपूर हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून 42 वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध; गर्भपात करून धमकी, आरोपीवर गुन्हा
शहरातील नौबागपुरा येथील 32 वर्षीय अंकित उर्फ देवेंद्र दीपक चापके याच्यावर 42 वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर गर्भपात घडवून धमकी दिल्याप्रकरणी अचलपूर समरसपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिलेच्या जबानीनुसार, आरोपीने 15 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार असे संबंध ठेवून ती गर्भवती झाली. गर्भधारणा झाल्यानंतर महिलेचा अशक्तपणा