अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर दिवाळीच्या दिवशी अर्धनग्न होऊन आंदोलन करणार े रघुनाथ अरबट यांची त्यांच्याच मावस भावाने फसवणूक केली होती. मात्र दिवाळी होऊनही एक नोव्हेंबर ची तारीख उजळली मात्र अरबट यांना पोलिसांकडून रिकवरी रक्कम मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्याने अखेर अरबट यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे येणाऱ्या तीन नोव्हेंबर रोजी ते तीव्र आंदोलन करणार असही त्यांनी म्हटलं आहे.