हवेली: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडले, जागीच मृत्यू.
Haveli, Pune | Sep 17, 2025 पिंपरी- चिंचवडच्या वाकड परिसरात अपघाताची भयंकर घटना घडली आहे. एका भरधाव कारने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात आज सकाळी साडेआठ वाजता एम्पायर गार्डनसमोर घडला. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे