दीपावली मिलन सोहळ्याच्या औचित्याने भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तथा शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी गोंदिया येथे दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या दुपट्ट्याने व पुष्पगुच्छ देऊन डोंगरे यांचे स्वागत करण्यात आले.