जालना: स्थायी समितीचे सभापती अशोक अण्णा पागारकर यांच्याकडून आयुक्त अंजली शर्मा यांचा सत्कार
Jalna, Jalna | Apr 9, 2026 नंदुरबार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर आज त्यांचा जालना महानगरपालिकेत औपचारिक सत्कार करण्यात आला. हा सत्कार जालना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अशोक अण्णा पागारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नव्याने रुजू झालेल्या आयुक्त अंजली शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जालना शहराच्या विकासासाठी, प्रशासनातील गती वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम व्हावे, या अपेक्षेसह त्यांचा सत्कार क