शिरूर कासार: रायमोहा येथे भीषण अपघात पिकअपच्या धडकेत एक महिला ठार तर चौघी गंभीर जखमी झाल्या
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे आज रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) सकाळी सुमारास सात वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली आहे. देवदर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलांच्या गटाला पिकअप वाहनाने जबर धडक दिल्याने एक महिला ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्या आहेत. शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे महिला देवदर्शनासाठी पायी जात होत्या. त्या रायमोहा परिसरातून जात असताना अचानक पिकप चा अपघात झाला