वाशिम: अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजना साठी लाभार्थ्यांची निवड २९ ऑक्टोबरला लॉटरी पद्धतीने होणार
Washim, Washim | Oct 18, 2025 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित वाशिम जिल्हा कार्यालयामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये असून अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समितीकडे एकूण ६२ पात्र अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३४ पुरुष व २८ महिला अर्जदार असून, त्यातून १५ पुरुष व १५ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.