भद्रावती: नमो ऊद्यानाची निर्मिती भवानी माता मंदिर परीसरात करा.
भाजपचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन.
राज्य शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन प्रत्येक नगरपरिषदेला नमो उद्यान निर्मितीसाठी एक कोटीचा निधी दिला आहे.सदर उद्यान विंजासन टेकडीवरील भवानी महिषासुर मर्दिनी मंदिर परीसरात निर्माण करावे अशी मागणी भाजपतर्फे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.