मद्यधुंद अवस्थेत भरधाव ऑटो चालवून एका ६० वर्षीय वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ऑटोचालकाला नरखेड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सावरगाव शिवारात रजनी रोडवर घडली.ज्ञानेश्वर वाढीवे (वय ६० हे ऑटोने प्रवास करत असताना, चालक सचिन श्रावण सातपुते याने दारूच्या नशेत ऑटो चालवल्याने तो उलटला. या अपघातात वाढीवे यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी हर्षल वाढीवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक सचिन सातपुते विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.