पवनी: निलज फाटा येथे स्कूल बसचा अपघात! २२ विद्यार्थी किरकोळ जखमी, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
पवनीवरून भिवापूर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल ची स्कूलबस आज गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास निलज फाटा परिसरात अपघातग्रस्त झाली. या अपघातात बसमधील २२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पालक व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढले.