31 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन सोनेगाव अंतर्गत येणाऱ्या मिहान येथे मिस्त्री चे काम करणारे लवकुश निषाद हे बिल्डिंगच्या अकराव्या माळ्यावर नळाचा वॉल चालू करण्याकरिता गेले असता अचानक तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरता एम्स रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे