पनवेलजवळ गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) दुपारी १२.२५ च्या सुमारास सीएसटीएन–जेएनपीटी रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची गंभीर घटना घडली. या अपघातामुळे या महत्त्वाच्या कॉरिडॉरवरील मालवाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दिवसाला तब्बल 130 मालगाड्या धावणाऱ्या या मार्गावरील वाहतूक अडथळ्यात येऊनही प्रवासी गाड्यांना मात्र कोणताही त्रास झाला नसल्याची माहिती पनवेल रेल्वे प्रशासनाने दिली.