वणी: शहरातील डॉ. संचिता नगराळे यांनी हाती घेतला भगवा, शिवसेनेत (उबाठा) प्रवेश, आ. संजय देरकर यांच्या निवास्थानी प्रवेश
Wani, Yavatmal | Nov 5, 2025 शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यां संचिता विजय नगराळे यांनी आज बुधवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या घरी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष पदाचा विजय खेचून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आ. संजय देरकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आ. संजय देरकर यांनी मार्गदर्शन केले.