जिल्ह्यातील पडोली ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत अत्यंत गंभीर प्रकार आज दि 16 डिसेंबर 12 वाजता उघडकीस आला आहे. एका जिवंत व्यक्तीला चक्क 'मृत' घोषित करून त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा केवळ हलगर्जीपणा नसून एक गंभीर गुन्हेगारी कृत्य असल्याची टीका NSUI आणि INTUC ने केली आहे.