वाळवा: इस्लामपूरजवळ दुचाकींची भीषण धडक; साखराळेचा एक युवक ठार, दोघे गंभीर
Walwa, Sangli | Sep 22, 2025 इस्लामपूरजवळील कारखाना परिसरात झालेल्या भीषण अपघातात साखराळे गावातील महेश राजाराम जाधव (वय 30) यांचा मृत्यू झाला, तर बोरगाव येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. इस्लामपूर-ताकारी मार्गावरील कारखाना परिसरात हा अपघात झाला. नेहमीप्रमाणे या मार्गावर वर्दळ सुरू होती. अचानक दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एका मृत्यू व दोघे जखमी अशी दुर्दैवी घटना घडली.