पाचोरा: शिंदाड येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे येथील व्यावसायिक दुकानदाराचे मोठे नुकसान, भरपाईच्या प्रतीक्षेत दिव्यांग दुकानदार,
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे येथील व्यावसायिक दुकानदाराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुकानातील संपूर्ण वस्तू या जलमय झाल्या होत्या, विकलांग असलेल्या व्यक्ती चे एकमेव उदरनिर्वाच साधन म्हणजे आपलं दुकान तेही या पावसाच्या प्रलयामुळे पाण्यात भिजल्याने संपूर्ण वस्तू ओल्या व चिखलाने माखल्या आहेत, सदर परिस्थितीचे पंचनामे तर झाले मात्र नुकसान भरपाई केव्हा पदरात पडेल याच्या प्रतीक्षेत नुकसानग्रस्त व्यावसायिक आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिसला.