आज दिनांक 7 डिसेंबर सकाळी 11 वाजता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे शहरातील एका आईस्क्रीम सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली. कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना गॅसचे फुगे हातात घेतलेल्या एका मुलाजवळ अचानक फुगे पेटले. ही घटना क्षणात घडल्याने एकच गोंधळ उडाला; मात्र विनोद पाटील हे थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा अनर्थ टळला.