अकोला,: संविधान दिनाचे औचित्य साधून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी 1 वाजता अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त दिलीप जाधव, संतोष नायडू, मंगेश जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. हा उपक्रम संविधानाच्या मूल्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी घेण्यात आला.