समुद्रपूर: तहसील कार्यालयात काढण्यात आली ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत: पारदर्शकतेसाठी करण्यात आली व्हिडिओ रेकॉर्डिंग
समुद्रपु:तहसिल कार्यालयात आगामी काळात १३ जून २०२५ ते १२ जून २०३० या कालावधी करिता तालुक्यातील ७१ सरपंच पदांचे प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार कपिल हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायत मधील सरपंचांची पदे सोडत काढण्यात आली.यावेळी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.