चांदूर रेल्वे: धानोरा म्हाली येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने केली पत्नीला मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
धानोरा म्हाली येथे राहणार एका 31 वर्षीय महिलेने तिच्या पती संतोष कावरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .सदर महिलेला संतोष यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, पैसे नाही म्हटले तर संतोष यांनी तिला शिवीगाळ केली व पैसे दे नाहीतर तुला मारतो अशी धमकी दिली व घरातील बाषाच्या काठीने उजव्या हातावर मारले त्यामुळे जखम होऊन रक्त निघाले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे .तेव्हा संतोष विरोधात पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.