जळगाव शहरातील वर्दळीच्या खोटे नगर परिसरातून हॉटले गावकरीच्या समोर बांधलेली हॉटेल मालकाची गाय चोरट्यांनी कारमध्ये कोंबून चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता समोर आली आहे. गाय चोरून नेतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.