राज्यभरातील नगरपरिषद नगरपंचायतीचा निकाल समोर आला असून आता राज्यातील विविध विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवारांची नावे ही समोर आली आहे. अशातच राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपाने नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी केली असून यात 27 पैकी 21 जागी भाजपाने विजय मिळविला आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपाला प्रथमच यश मिळाले.