जालना: तरुणाचे तिव्र उन्हात बसून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन;विस्तार अधिकार्यावर गंभीर आरोप;जैनपूर कोठारा ग्रामपंचायत चौकशीची करा
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जैनपूर कोठारा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत तक्रारदार सुरज पांडुरंग रोडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सोमवार दि. 1 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेसमोर दिवसभर तिव्र उन्हात बसून उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. विस्तार अधिकारी गजानन घोळवे आणि एका अज्ञात अभियंत्याने संबंधित ग्रामसेविकेला वाचवण्यासाठी संगनमताने चौकशी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.