मौजा वारेगाव शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर खापरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १० जानेवारी च्या पहाटे करण्यात आली.आरोपीकडून २ ब्रास रेतीसह ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सहा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी आकाश विजय चौरे आणि सुभाष गणेश भोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.