यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत, आज प्रभाग क्रमांक २८ भागामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रा. प्रियंका जितेंद्र मोघे आणि नगरसेवकपदाचे उमेदवार सायली भगत व अजय शिरभाते यांच्यासाठी नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.