महाड येथून गोरेगावकडे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेल्या जात असलेल्या चार गोवंशांची महाड एमआयडीसी पोलिसांनी वेळेवर कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक बोलेरो पिकअप वाहनासह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) सकाळी ५.४५ ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान, मौजे नागलवाडी गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पुलावर करण्यात आली.