वाशिम: कामरगाव येथे अति पावसाने सोयाबीन सह तुर पिकाचे नुकसान शेतकऱ्याने तुरीच्या पिकात सोडले गुरे व फिरवला नांगर
Washim, Washim | Oct 16, 2025 तालुक्यातील कामरगाव परिसरामध्ये यावर्षीच्या पावसाळा मध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे या परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन अत्यंत कमी झाले असून ज्या शेतात सोयाबीनचे सरासरी उत्पादन एकरी आठ ते दहा पोते होते त्या शेतामध्ये यावर्षी एक ते दोन पोते सोयाबीन झाले आहे. त्यालाही प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्या वर भाव मिळत नाही. याबरोबरच या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले तुरपीकही जळाले असल्याने यातून फार काही उत्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही.