साकोली येथे 29 जूनला कोहळी समाजाचा भव्य मेळावा
सेंदूरवाफा येथील मंगलमूर्ती सभागृहात सोमवार दिन29 जूनला दु.1लाआयोजन
साकोली येथे 29 जूनला कोहळी समाजाचा भव्य मेळावा साकोली सेंदूरवाफा येथील मंगलमूर्ती सभागृहात सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी एक वाजता केंद्रीय कोहळी समाज विकास मंडळ नागपूर व कोहळी पाटील संघर्ष मंच व समस्त कोहळी पाटील समाज बांधव यांच्यातर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या न्याय हक्कांसाठी आणि समाजाच्या संघटित शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी भंडारा गोंदिया लोकसभा,चिमूर गडचिरोली लोकसभा , साकोली ,तुमसर ,अर्जुनी मोरगाव चिमूर, ब्रह्मपुरी बल्लारपूर आणि आरमोरी विधानसभेतील समाज बांधवांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे