जालना: मागासवर्गीय शेतकर्यांच्या गायरान जमिनी लागवडीयोग्य क्षेत्रात नोंदवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
Jalna, Jalna | Jun 25, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग, जालना जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. गुरुवार दि.25 जून 2026 रोजी दु. 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागासवर्गीय शेतकर्यांच्या गायरान जमिनीवरील पोट खराब क्षेत्राची नोंद तातडीने रद्द करून त्या लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट कराव्यात,तसेच वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,अशी मागणी आंदोलनातून केली.