निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे कार्यरत सुरक्षा रक्षकांचे मागील तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या संदर्भात सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाने भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. या प्रकरणाची आ. किशोर जोरगेवार यांनी आज दि 18 ऑक्टोबर 12 वाजता गांभीर्याने दखल घेत तत्काळ अधिष्ठाता यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने बैठक घेण्याच्या सूचना केल्या.