पनवेल – पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या देखरेखीखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, एकूण २ हजार बांबूच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.