काटोल: विवाहित युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने बाजारगाव येथे उडाली खळबळ
Katol, Nagpur | Nov 24, 2025 बाजारगाव येथे एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव रामेश्वर क्षीरसागर वय पस्तीस वर्ष असे सांगण्यात आले आहे. रामेश्वर हा मूळचा नरखेड येथील रहिवासी असून तो सासरी बाजार गाव येथे राहत होता आणि येथूनच एका कंपनीमध्ये काम करत होता. 23 नोव्हेंबरला सकाळी त्याने नाष्टा केला आणि नंतर फिरायला जातो असे सांगून घरून निघून गेला दरम्यान दुपारी घरी आल्यानंतर अचानक त्याला उलटी झाली.