नागपूर ग्रामीण: डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर मिळेना; ग्राहकांचा तहसीलदारांकडे धाव
नागलवाडी येथील **संगम गॅस एजन्सीच्या** मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्राहकांना सिलेंडर घरपोच मिळाल्याचे बनावट मेसेज येत असून प्रत्यक्षात मात्र गॅस मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या त्रासामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तहसीलदार नितीन गोहणे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.