नागपूर ग्रामीण: संभाजीनगर येथे राहणारी 29 वर्षीय महिला अडीच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन बेपत्ता
पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील संभाजीनगर येथे राहणारी सौ लक्ष्मी सूर्यवंशी ही दिनांक 28 एप्रिल ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास तिची मुलगी मनस्वी वय अडीच वर्ष हिला घेऊन घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी पोलीस स्टेशन कोराडी येथे मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.