सातारा: सातारा शहर पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना केली अटक, दोन दुचाकी केल्या हस्तगत
Satara, Satara | Oct 18, 2025 सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कर्नाटक राज्यातील गोकाक येथील अबुबखर बादशाह मुलतानी वय ३१ आणि कोरेगाव येथील रोहित सुरेश राजपुत वय १९ या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी १.३० वाजता दिली.