नागपूर ग्रामीण: विदर्भात पक्षाचा विस्तार होणार; बच्चू कडूंच्या संभाव्य आगमनाचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केले स्वागत
विदर्भात पक्षाचा विस्तार व्हावा, ही आमची भूमिका आहे. बच्चू कडू आमच्या पक्षात येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, असे सूचक विधान माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी नागपुरात केले. दरम्यान, ते नागपुरात 'बीएलए' (BLA) नियुक्ती आणि मतदार यादी पुनर्विलोकन संदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आले होते.