आज गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास माणगाव तालुका पुणे गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते महिला भगिनींनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीची वारे जोरात वाहू लागले असतानाच सध्या रायगड जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचा बोलबाला जोरात सुरू आहे तसेच शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे देखील मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.