पनवेल: डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून सिकेटी विद्यालयात साजरा
Panvel, Raigad | Oct 15, 2025 भारतरत्न डॉक्टर ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला करण्यात येतो. त्यानुसार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी.के.टी . विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या पुढाकाराने आज बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हा दिवस उत्साहात पार पडला. यावेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ,वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी, आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक असल्याचे सांगितले.