भिवंडी परिसराच्या नारपोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंजुर फाटा येथे एक धक्कादायक घटना घडली. एक दहा वर्षाचा श्रीनिवास कदम नावाचा मुलगा शाळेत गेला मात्र शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक दुचाकी आली आणि तिने उडवले. यामध्ये तो खूप लांब अंतरावर जाऊन पडला त्यावेळी गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरात एकाच आठवड्यात रस्ते अपघातात दोनच चिमूरड्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.