जळगाव: जोशीपेठ येथे अल्पवयीन मुलीला मारहाण करून दिले चटके; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोर्टात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये उलटा जवाब दे आणि भावासोबत लग्न कर असे सांगून एका अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करत मांडीला व पाठीला चटके लावून मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील जोशीपेठ येथे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री 8 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.