पाचोरा: सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावसामुळे दगडी नदीला पूर, उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली,
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने तसेच घाटनांद्राकडे मोठ्या प्रमाणात पाऊसाचा जोर वाढल्याने संपूर्ण पावसाचे पाणी हे सातगाव डोंगरी गावातील दगडी नदीतून जोरदार वाहत आल्याने नदी थळीवरील ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र, परिसरातील घरे, व निम्मे गाव हे पाण्याखाली आल्याने ग्रामस्थांची मोठी तारांबळ आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता उडालेली पहावयास मिळाली, ढग सदृश्य पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आल्याने दगडी नदी दुतर्फा वाहत होती.