नागपूर ग्रामीण: भवानी नगरमधील विहिरीत आढळला अज्ञात मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू
पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भवानी नगर भागातील एका सार्वजनिक विहिरीत आज, २२ मे रोजी सकाळी एक अज्ञात मृतदेह तरंगताना आढळून आला. सकाळी १०:५४ वाजता माहिती मिळताच लक्कडगंज अग्निशामक केंद्राचे पथक अवघ्या तीन मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.लक्कडगंज अग्निशामक केंद्राचे उप अधिकारी श्री. दुर्गाप्रसाद आर. चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी शिताफीने मृतदेह विहिरीबाहेर काढला.