नागपूर ग्रामीण: NEET पेपर फुटीप्रकरणी अभाविप आक्रमक; नागपुरात जोरदार निदर्शने आणि एनटीए संचालकांच्या राजीनाम्याची मागणी
'नीट' परीक्षेतील कथित पेपर फुटी आणि गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नागपूर येथे जोरदार निदर्शने करत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (विरोधात आपला रोष व्यक्त केला.अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनके यांनी माध्यमांशी बोलताना 'एनटीए'च्या कार्यपद्धतीवर तीव्र ताशेरे ओढले