खांदा कॉलनी येथे श्री संत वामनभाऊ आणि भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना श्रद्धेचा जनसागर लोटला होता. या सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या सोहळ्यामध्ये केवळ वारकरी संप्रदायच नव्हे, तर सर्व स्तरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या उपस्थित राहून सामाजिक एकतेचे दर्शन घडवले.