जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (तारांकित प्रश्न क्र. ३३) त्यांनी हा गंभीर मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या या निर्णायक 'आवाजा'ला मोठे यश मिळाले असूनजिल्ह्यासाठी तब्बल ९३.७६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई आज दि.२ डिसेंबर ला १२ वाजता जाहीर केली आहे.