७ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डी मार्ट समोर सापळा रचून एमडी ची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगे हात पकडले आहे अटकेतील आरोपीचे नाव इरफान शेख रहीम शेख असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून सात ग्रॅम ८८ मिलिग्रॅम एमडी व एक मोबाईल फोन असा एकूण 88,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून आरोपीविरुद्ध गुन्हा ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे विनायक कोली वपोनी