भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचे स्मरण करीत 7 नोव्हेंबर रोजी राज्यभरात विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो. या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत अत्यंत उत्साहाने विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही विद्यार्थी दिवस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रभावी प्रसंगांविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली याप्रसंगी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील जीवनपटही प्रोजेक्टरच्या माध्यमातून शाळांमध्ये दाखविण्यात आला तसेच त्यांच्या कार्याची माहिती व महती सांगण्यात आली.