जळगाव जामोद: माणिक वाघ यांच्यावरील कारवाई राजकीय द्वेषा पोटी उबाठाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघयांचा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आरोप
माणिक वाघ यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेष पोटी करण्यात आली आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी शहरातील बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माणिक वाघ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.