निफाड: लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या कुंदन नरेश पावरीया हत्याकांडानंतर परिसरात तणावाचे वातावरण
Niphad, Nashik | Sep 18, 2025 नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या कुंदन नरेश पावरीया हत्याकांडानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकतर्फी प्रेमाच्या संशयातून झालेल्या हल्ल्यात २० वर्षीय कुंदन पावरीय याचा नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप असून मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.