जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक ५ मधील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी खळबळजनक घटना घडली होती. बोगस मतदानाचा संशय घेऊन एका मतदाराला आणि त्याच्या सहकाऱ्याला मतदान करण्यापासून रोखत, त्यांना बेदम मारहाण करण्यात आले होते. याप्रकरणी पियुष नरेंद्र पाटील आणि रवी शिंदे यांच्याविरुद्ध रविवारी 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे